थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुरंदर तालुक्यातील संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरमधील नारायण महाराज हे सोमवारी सायंकाळी कालवश झाले.त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर यज्ञकुंडाजवळ अंत्यसंस्कार केले जाणारआहेत. दत्तभक्त म्हणून ओळखले जाणारे नारायण महाराज यांनी लाखो भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले.त्यांनी माणसातला माणूस जागा केला तसेच चार धामांची निर्मिती केली. समाजपरिवर्तन व समाजप्रबोधनाचे मोठे काम केले होते. दत्त संप्रदायाचे प्रचारक आणि प्रसारक आद्य शंकराचार्यानंतर देशामध्ये चार दत्तधाम बांधणारे मानवजोड प्रकल्पाचे ते प्रणेते होते.
