शेतकरी सभासदांचा बारा वर्षांचा वनवास संपवून यशवंत सुरूच करुन दाखवणार
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यात थेऊर येथे अण्णासाहेब मगर यांनी याभागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दूरदृष्टीचा विचार करुन शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन माळरानावर तालुक्याच्या विकासासाठी एक विकासाचे स्वप्न पाहिलं परंतु यशवंतच्या जीवावर ज्यांनी तालुक्यात राजकारण करुन मोठमोठी राजकीय पदे भोगली तीच मंडळी आज केवळ यशवंतवर सत्ता मिळविण्यासाठी एकत्र आली असून यांनी बारा वर्षे कारखाना बंद असताना कधी सभासदांची साधी विचारपूस केली नाही तीच मंडळी यशवंतला बंद पाडून केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आली असून तो मी नव्हेच ची भूमिका यशवंतसाठी मारक ठरणार असून सूज्ञ सभासद आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीलाच निवडून देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे प्रतिपादन पॅनल प्रमुख प्रकाश जगताप यांनी लोणी काळभोर भागातील सभासदांच्या गाठीभेटी घेत असताना केले.
यशवंतच्या दिवाळखोरीला खरेतर विरोधकच कारणीभूत असून 1 इंचही जागा न विकता यशवंत सुरु करू अशा वल्गना करणारे सभासदांची दिशाभूल करत आहेत. परंतु माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे यांनी कारखाना सभासदांच्या ताब्यात राहण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले निवडणूक लावली बिनविरोध करण्यासाठी प्रत्येक गटात बैठका घेतल्या त्यावेळी या मंडळींनी साधी लोकवर्गणी ही न देता हास्यास्पद वक्तव्य करत खिल्ली उडवण्याचे काम केलं. विरोधक मंडळी म्हणजे खोटं बोल पण रेटून बोलत आहे तालुक्याच्या अस्मिता असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची उर्वरित जमीनही बांधकाम व्यावसायिकांना द्यायची भूमिका आहे. हे कारखान्याची १ इंच ही जमीन शिल्लक ठेवणार नाहीत करोडोच्या वल्गना करायच्या आणि सभासदांच्या लोकवर्गणीतून सुरू झालेल्या या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरती डोळा ठेवायचा ही यांची जावो तिथे खाऊ हीच भूमिका आहे. यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे असा यावेळी घआणआघआत यावेळी प्रकाश जगताप यांनी केला. माधव काळभोर आणि प्रकाश म्हस्के या जोडगोळीने अध्यक्ष असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हवेली तालुका खरेदी विक्री संघासाठी अण्णासाहेब मगर यांनी दिलेली बारा गुंठे शासकीय जागा संस्थेच्या फायद्यासाठी न वापरता आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी याचा वापर करण्याचा कारभार यांनी केला आहे आणि आता हीच टोळी आपल्या तालुक्याचे अस्मिता असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोक्याच्या जागेवरती नजर ठेवून आहे.
यशवंत सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू होण्यासाठी पांडुरंगआप्पा काळे यांनी केलेलं काम सर्व सभासदांना माहित आहेच. आज त्यांच्याच घरातील तरूण मोरेश्वर काळे हा कारखाना वाचवण्यासाठी घरोघरी फिरत आहे. आज ही तरुणपिढी आणि प्रशांत काळभोर, बाळासाहेब चौधरी यांच्यासह आम्ही हा यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा संकल्प केला असून सभासदांच्या मनातील इच्छा पूर्ण करणे हीच आमची भूमिका आहे. हवेली तालुक्याची अस्मिता आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक गणित जुळवण्यासाठी हा कारखाना पुन्हा सुरू होणं ही काळाची गरज आहे याची जाण अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलला आहे तरी सर्व सभासदांनी या पॅनलच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी कपबशी या चिन्हावर शिक्का मारून मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
