पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मराठवाड्यासाठी भरभरून घोषणा केली यामध्ये संतपीठ,वैद्यकीय महाविद्यालय, सौरऊर्जा प्रकल्प या बरोबरच तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास केला जाईल असे त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.

       राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास आवश्यक आहे परंतु मराठवाड्याकडे दुर्लक्ष झाले आहे विकासाची गंगा केवळ पश्चिम महाराराष्ट्रात केंद्रित झाले त्यामुळे विकासाचा असमतोल आजपर्यंत दिसतो आहे प्रत्येक निवडणूतिच्या वेळी घोषणा होतात परंतु प्रत्यक्षात विकास दूरच त्यामुळे येथील तरुणांना विस्थापित व्हावे लागते.
       मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून प्रसिध्द आहे  संतांची शिकवण ही म्हण आहे त्यासाठी औरंगाबाद येथे संतपीठ झाले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा होती त्याची पूर्तता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. निजामाच्या जाचक राजवतीतून स्वतंत्र झालेल्या हैद्राबाद संस्थान मधील मराठवाड्यातील सात जिल्ह्याचा समावेश आहे आज मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी स्मृती स्तंभास अभिवादन केले.
         मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोलीत हळदी प्रक्रिया प्रकल्प,२०० मेगा वँटचा वीज प्रकल्प तसेच वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री परिसर स्वच्छ करून भाविकांची सोय करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.तर औरंगाबाद अहमदनगर रेल्वे मार्ग मार्गी लागावा यासाठी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी मागणी केली. एवढेच नाही तर मराठवाड्यातील गुंठेवारी प्रश्न सोडवला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *