पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील आळंदी म्हातोबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी आळंदी म्हातोबा गावांतील लोकसंख्याने कमी असलेल्या गावातील कार्यकर्तेला संधी मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या निवडीचे स्वागत केले असून दरवेळी सरकार कुठलेही आले तरी लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या गावांना या पदासाठी संधी देण्यात प्रत्येक पक्ष आघाडीवर असायचा परंतू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आळंदी म्हातोबा गावाला संधी मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या निवडीचे स्वागत केले आहे. याबाबत दिलीप वाल्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन पूर्व हवेली तालुक्यातील गावांमधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळवून परिसरातील गावांमधील विकासकामे मार्गी लावणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *