पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी वाल्मीक गबाजी जवळकर तसेच उपाध्यक्ष पदी विजय सुर्वे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आळंदी गावातील विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबविण्यात सहभागी होऊन सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रमचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो त्यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी आळंदी म्हातोबा गावच्या सरपंच सोनाली तुषार जवळकर,दिलीप वाल्हेकर,भगवान जवळकर,मोहन जवळकर,अशोक जवळकर,दत्तात्रय जवळकर,सोमनाथ जवळकर,दिनकर भोंडवे,साहेबराव जवळकर,मारुती जवळकर,लक्ष्मण भोंडवे,माऊली जवळकर,संतोष पां.जवळकर,रामभाऊ भोंडवे,विजय जवळकर,रतन झेंडे, शंकर जवळकर,तुषार जवळकर,संतोष का. जवळकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
