थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार व बँक ऑफ बरोडा यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यातील थेऊर फाटा येथे युवकाना उद्योजक बनविण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण भागातील युवक व युवतीना १३ दिवसीय बांबू क्राफ्ट या विषयाचे यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षणा साठी बांबू विषयाचे तज्ज्ञ प्रशिक्षक सागर पवार लाभले होते त्यामध्ये त्यानी बांबू पासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू कशा तयार करायचे तसेच हा व्यवसाय कमी खर्चात उत्तम रित्या कसा करू शकतो याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले.

बँक ऑफ बरोडा आरसेटी चे संचालक दिनेश पाटील यांनी युवकांना बँकिंग म्हणजे काय तसेच बँकेचे ज्ञान एका व्यवसायिकाला किती महत्वाचे आहे आणि बँकेच्या विविध योजना व त्याचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विवेक जाधव यांनी आजच्या युगातला उद्योजक कसा असावा,त्याच्यामध्ये कोणते गुण असावे तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी उद्योजकता विकास विषयाचे मार्गदर्शन केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *