पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे ग्रामीण पोलीस दलातील भिगवण पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षकावर वीस हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, भिगवन पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे वय 53 वर्ष यांनी तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले असून त्यांना धडक देणाऱ्या वाहनाची इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच मागितली,यासाठी खाजगी इसम वकील मधुकर कोरडे यांनी तडजोडांती 20,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आहे . ही लाच रक्कम खाजगी वकील इसम कोरडे यांनी लोकसेवक लोकरे यांच्याकरिता 20,000 लाच पंचासमक्ष स्वीकारली असून लोकसेवक यांचे लाच मागणीस प्रोत्साहन दिले आहे. त्या दोघांनाही ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक,अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक

वीरनाथ माने,पोलीस हवालदार नवनाथ वाळके,पोलीस शिपाई माने,कांबळे चालक सहाय्यक पोलीस फौजदार जाधव यांनी पार पाडली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *