पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध तक्रारदार यांनी त्यांची ऑनलाईन व्यवहारातुन फसवणुक झाल्याबाबत सायबर तपास पथक लोणीकंद यांस तक्रार दिलेली होती. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनानुसार सायबर तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे व पथक विविध तक्रारीचे अनुषंगाने काम करीत असताना अशोक शर्मा यांचे दिनांक ०४/०७/२०२३ रोजी त्यांचे संमतीशिवाय व ओ.टी. पी. शेअर केल्याविना ८८, ३६७.२४/- रुपयांचे क्रेडीट कार्ड द्वारे फसवणुक झालेली होती त्यांचे रकमेचे निरीक्षण केले असता सदरचा व्यवहार पे पल मर्चंटला झालेचे निदर्शनास आले सायबर तपास पथकाने विनाविलंब संबंधित कंपन्यांचे नोडल ऑफिसर्स यांना संपर्क करुन तसेच तातडीने पे पल मर्चंट यांना ई-मेल द्वारे माहीती देऊन पाठपुराव्याने तक्रारदारांचे संपुर्ण पैसे परत केले.
तसेच दिलीप जरांगे यांचे दिनांक ०६/०९/२०२३ रोजी ०६,५००/- व पूजा शिंदे यांची दिनांक २३/०८/२०२२ रोजी फोन पे मधुन बोलत असुन रिवार्ड देण्याचे बहाण्याने ०४,०००/- रुपयांची फसवणुक झालेली होती या तिघांचे संपुर्ण पैसे परत मिळवून देण्यात लोणीकंद सायबर तपास पथकास यश आलेले आहे. त्यांनी लोणीकंद सायबर तपास पथक यांचे आभार मानले.
सायबर तक्रारीचे अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी सायबर तक्रारीत अडकलेल्या नागरिकांसाठी जाहीर आवाहन
“सायबर फसवणुक झालेस घाबरून न जाता प्रथमतः विनाविलंब पैसे वाचविण्याकरीता / मनी ट्रेल शोधण्याकरीता अशा व्यक्तीने सायबर क्राईम पोर्टल https://cybercrime.gov.in/ यावर सविस्तर अकांऊट ओपन करुन पुर्ण ट्रान्झेक्शनची माहीती भरावी व अॅप्लिकेशन सबमीट करावे तसेच सदर तक्रार नोंद करीत असताना काही अडचण आलेस टोल फ्रि सायबर हेल्पलाईन नंबर १९३० यावर अधिक माहीती/मदत घ्यावी. पुढील कारवाई करीता सदरची कॉपी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे सबमीट करावी. सायबर तपास पथक आपले फसवणुक झालेल्या व्यवहारांची छाननी करुन त्यावर कायदेशीर कारवाई करेल”.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परीमंडळ – ०४ शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलिस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे सीमा ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस स्टेशन सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केलेली आहे.
