थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] लहान वयात मुलांवर संस्कार झाले तर याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात उपयोग होतो,आई वडील यांनी याचे बाळकडू बालवयात दिल्यानंतर पुढील समाजात एक सुजाण नागरीक बनविण्याची जबाबदारी येऊन पडते ती शिक्षकांची,प्राथमिक अवस्थेत हे सामाजिक संस्कार मिळाले तरच तो विद्यार्थी आपल्या पुढील शैक्षणिक जीवनात याच शिदोरीच्या जोरावर बिनधास्त मार्गक्रमण करतो.सरकारी शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या मुलांवर आपले सर्वस्व पणाला लावून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे सर्वच कौतुक करतात.हवेलीतील थेऊर येथील तारमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अशाच संस्कारमय शिक्षणाचा अनुभव येथील विद्यार्थी घेत आहेत.

आपल्या देशात वर्षभरात वेगवेगळ्या ऋतूत वैविध्यपूर्ण सणांची संरचना करण्यात आली आहे यातून पर्यावरण संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेच तसेच कुटुंब व्यवस्था अबाधित राखण्याचा देखील प्रयत्न केला आहे.कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे यातून वडिलधार्यांचा आदर राखला जातो.तारमळा प्राथमिक शाळेत नुकतेच आजोबा – आजी दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आजोबा आजींनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमात पालकांनी विविध पाककृती तयार करून प्रदर्शन मांडले होते.यामधून देखील भारतीय पाक कलेची झलक उपस्थितांना अनुभवता आली आणि ती मेजवानी चाखता आली.यातून शाळेचे पालक खरोखरच उत्साह दाखवतात आपल्या पाल्यांच्या भविष्याबद्दल जागरूक आहेत हेच सिद्ध होतय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *