पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] मुंबई उच्च न्यायालयाने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेस मान्यता दिल्यानंतर निवडणुक प्रक्रियेस वेग आला असून या महिन्यानंतर ही प्रक्रिया प्रत्यक्षात चालू होईल, यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी यासाठी पुढाकार घेऊन संचालक मंडळ निवडणुक घ्यावी अशी आग्रही भूमिका घेतली कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत यास सहमती मिळाली आणि याला गती आली.पांडुरंग काळे यांनी सर्व गटात बैठका घेऊन निवडणूक निधीसाठी खुप प्रयत्न केले आणि निधी उभारला.आणि सुरुवातीपासून त्यांनी प्रत्येक सभेत ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका मांडली.

न्यायालयाच्या निकालानंतर सभासदांशी विचारविनिमय करण्यासाठी पुन्हा पांडुरंग काळे यांनी यशवंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह गटनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे.नुकतीच उरुळीकांचन गटाची बैठक पार पडली.यावेळी यशवंतचे माजी चेअरमन के.डी कांचन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजाराम कांचन,मनिभाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे,आप्पासाहेब कड,सरपंच भाऊसाहेब कांचन, सुरेश सातव,संतोष कांचन, अमित कांचन, संजय टिळेकर यासह अनेक पदाधिकारी व उरुळी कांचन, भवरापुर, बोरीऐंदी, डाळिंब, खामगावटेक, सहजपुर, बोरीभडक नांदुर,ताम्हणवाडी, टिळेकरवाडी या गावामधील सभासद उपस्थित होते सभासद उपस्थित होते.ही बैठक उरुळीकांचन मधील श्रीराम मंदिरात पार पडली.

गेली बारा वर्षांपासून बंद असलेला यशवंत पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा एक सूर या बैठकीत निघाला.अनेक राजकीय वरिष्ठांकडून अपेक्षा असताना केवळ भ्रमनिरास झाल्यानंतर यशवंतचा सर्वसामान्य सभासदच पुन्हा एकवटून कारखान्यासाठी एकत्र आला.संचालक मंडळ निवडणुक प्रक्रिया बिनविरोध व्हावी यासाठी विचारविनिमय करण्यात आला पहिल्या गटातील सभासदांकडून बिनविरोध निवडणुक व्हावी अशीच भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन के डी कांचन म्हणाले की,ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासंदर्भात सभासदांनी सहकार्य करावे सर्व पक्षीय संचालक मंडळ तयार करून हा कारखाना येत्या हंगामात कसा चालू करता येईल यासाठी कसोशीन प्रयत्न करावे लागतील. आपल्याकडे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे दोन महिन्यात मशिनरी बसवता येतील आणि ट्रायल हंगाम घेता येईल. सभासदांना सध्या ऊसाला योग्य बाजारभाव मिळत नाही आपल्या हक्काचा कारखाना चालू झाल्यानंतर चांगला बाजारभाव देता येईल यासाठी दोन एक वर्षाचा कालावधी लागेल.

या कार्यक्रमाचे आभार युवराज कांचन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *