पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकपणा यावा यासाठी जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य घेताना आपला मोबाईल नंबर ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचा ठसा देवून अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
सध्या रेशन कार्ड बाबतीत सरकारकडून अनेक उपाययोजन राबवल्या जात आहे. गरजू लोकांपर्यंत धान्य पोहोचावे, तसेच शासनाकडून जितके धान्य दिले जात आहे तितके धान्य लाभार्थ्यांना मिळावे, यासह रेशन वितरणाची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहे. रेशन कार्डला मोबाईल क्रमांक जोडणे हा त्याचाच भाग आहे. यामुळे पावतीसह प्रत्येक शिधा पत्रिका धारकाला आता मेसेजद्वारे त्याला किती धान्य मिळाले, याची माहिती मिळणार आहे. यातूनच प्रक्रियेत अधिक पारदर्शकपणा येणार आहे.
