पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्यातील्र मुळा मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाअंतर्गत सहा हजाराहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. याला मनसेने विरोध केला असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे

नदीकाठ सुधार प्रकल्पातून वृक्ष तोड थांबवून पर्यायी व्यवस्था शोधावी, असे वसंत मोरे यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच या विषयी मोरे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटूनही निवेदन दिले आहे.

पुणे मनपाच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यातील कामासाठी सुमारे ६००० वृक्षतोड करण्यात येणार आहे. यातील ९० टक्के वृक्ष हे देशी जातीचे आहेत.यापैकी ३२४९ वृक्ष पूर्णपणे काढण्याचा व २८१३ वृक्ष काढून त्यांचे पुनर्नरोपण करण्याचा प्रस्ताव पुणे मनपाने वृक्ष संवर्धन समितीसमोर मंजुरीसाठी ठेवल्याचे समजते. वृक्ष पुनर्रोपण झाल्यानंतर ते १००% यशस्वी होतात असे नाही त्यामुळेच ही पर्यावरणाचा र्‍हास थांबवावा असे म्हटले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *