थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे सोलापूर महामार्गावरून थेऊर कडे जाणाऱ्या रेल्वे पुलावर एका दुचाकी वाहनाचा अपघात झाला असून यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे याची माहिती वाहतूक शाखेस मिळतात वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी उमेश ढाकणे व बांगर घटनास्थळी तत्परतेने दाखल होऊन अपघात ग्रस्त जखमी तरुणास रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथे उपचारासाठी पाठविले

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊरगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे उडान पुलावर मधोमध दोन्ही बाजूला पदाचारीकडे आहेत हे कठडे अनेक वेळा अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत अनेक अपघातग्रस्त जायबंदी झाले तर काहींनी आपला जीव गमावला आहे श्री चिंतामणी गणपती दर्शन साठी येणाऱ्या भाविका बरोबरच पुणे सोलापूर पुणे अहमदनगर तसेच पुणे नाशिक या मार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने गेल्या काही काळापासून येथील वाहतूक प्रचंड वाढली आहे आणि त्यात अलीकडे या रस्त्याचे काम झाल्याने वाहनांची गती भरमसाठ वाढली आहे त्याने अपघाताचे प्रमाण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले आहे जवळपास दररोज या मार्गावर अपघात होताना दिसतात आज सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी स्वार इथे अपघातग्रस्त झाला व गंभीर जखमी झाल्या अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी उमेश ढाकणे व बांगर यांना मिळाली ते तत्परतेने घटनास्थळी पोहोचून त्यांनी तरुणास उपचारासाठी रुग्णालयात हलविले.अपघातातील जखमीची माहिती मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *