पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) वीज गळती रोखण्यासाठी वीज चोरांवर कारवाईचा बडगा उगरत महावितरण कडून दौंड शहर व परिसरात तब्बल २५७३ युनिटीची वीज चोरी पकडून पाच जणांवर वीज चोराचा गुन्हा दाखल केला आहे.

           महावितरणने थकबाकी व अन्य कारणांमुळे कायमस्वरूपी वीजमीटर बंद असलेल्या वीज ग्राहकांचे मीटर तपासणी मोहीम हाती घेतली असताना तपासणी करताना ही घटना समोर आली याबाबत दौंड येथील ‘महावितरण’चे सहायक अभियंता बी. एच. देसाई यांनी माहिती दिली की, वीजमीटर बंद असताना मुख्य वीजवाहिनीवरून थेट चोरून वीजजोड घेणारे प्रकाश रमेश मोरे (रा. सिटी गोल्डन अपार्टमेंट, समर्थनगर, लिंगाळी, ता.दौंड), हसीना इब्राहिम शेख (रा. शालीमार चौक, दौंड), अर्जुन रामचंद्र माने ( रा. हनुमान मंदिराजवळ, बालाजीनगर, लिंगाळी), मोहमद मेहबूब सय्यद (रा. रमाईनगर, बारामती चाळ, दौंड) व सुधाकर मारुती लोंढे (रा. जगदाळे वस्ती, लिंगाळी) यांच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घरगुती व व्यावसायिक कारणांसाठी एकूण २५७३ युनिट वीज चोरण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *