पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने सोमवारी रात्री 17 महिलांच्या घोळक्यास धडक देऊन पळ काढला होता यात पाच महिलांचा मृत्यू झाला यास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालक व अपघातग्रस्त मोटार खेड पोलिसांनी केवळ 36 तासाच्या आतच ताब्यात घेऊन कानिफनाथ बबन कड रा. संतोषनगर, वाकी यास ताब्यात घेतले आहे.

राजगुरुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानिफनाथ खड हा भरधाव वेगात मोटार घेऊन पिंपरी फाटा येथे रात्री पावणे अकराच्या सुमारास निघाला होता यावेळी पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे बसमधून उतरून मंगल कार्याकडे कामासाठी जाण्याकरिता रस्ता ओलांडणाऱ्या 17 महिलांच्या जमावाला या मोटारीने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात महिला चेंडूप्रमाणे हवेत उचलून रस्त्यावर आढळल्या यात दोन महिलांचा जागीच तर तीन महिला उपचारादरम्यान रुग्णालयात दगावल्या आणि इतर चार महिला गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला होता. पोलिसांना वाहन चालकाबाबत कोणती माहिती उपलब्ध नव्हती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी अज्ञात वाहनाचा वचालकाचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार केली. ते अपघात घडलेल्या ठिकाणाहून चारही दिशेकडे शोध घेत होते कानिफनाथ कड हा खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हैद्रोस बच्चेवाडी येथे नातेवाईक यांच्याकडे घराच्या कडेला वाहन लावून लपून बसला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट यांनी त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेच्या आधारे माहितीच्या आधारे माग काढून त्यास ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *