पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुण्यातील कसबा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही याचेच संकेत मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी तसे विधान केले आहे.

कसबा मतदारसंघातील  भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कसबा व चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याच्या तारकची घोषणा केली यावर दोन्ही मतदारसंघात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात निवडणूक लढविण्या संदर्भात एकदम झाल्याचे सांगण्यात आले.

कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे रुपाली ठोंबरे यांनी पंढरपूर पोटनिवडणूकीचा दाखला देत ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असे सुचवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *