थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पूर्व हवेलीत ओढ्यावरील अतिक्रमणावर महसूल विभाग कोणतीच ठोस कारवाई करत नसल्याने याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.थेऊर येथील नायगाव रस्त्यावरील ओढ्याचा मार्ग बदलून त्याची रुंदी करुन बंद नळ्यातून ओढ्याचे पाणी काढले आहे याचा परिणाम आज झालेल्या प्रचंड पावसानंतर येथील ओढ्याचे पाणी रस्त्यावर आले त्या अरुंद मार्गिकेतून जाऊ शकले नाही.

 

आज पुणे शहरासह पूर्व हवेलीतील गावांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.यात शेतीचे मोठे नुकसान तर झालेच परंतु थेऊर येथील गट क्रमांक 63 मध्ये ओढ्यावरील अतिक्रमणामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले सर्वत्र पाणीच पाणी पसरले.याचा फटका चाळीसच्या वर घरांना बसला मोहन नरेश यादव हरिदास कांबळे राजू हजारे परसराम राऊत कांताराम देवराम कुंजीर यास अनेक जणांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना अक्षरक्ष घराच्या छतावर झोपण्याची वेळ आली आहे.

याची माहिती मिळताच लोणी-काळभोर पोलीस स्टेशन अंतरंगत येणाऱ्या थेऊर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय जाधव जिल्हा परिषद रुकेवस्तीचे शिक्षक संजय आगलावे यांनी घटनास्थळी भेट देऊन बाधित नागरिकांना मदत केली तर शाळेच्या खोल्या आसर्यासाठी उपलब्ध करुन दिल्या.

या प्रश्नावर हवेलीनामा ने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना याचा धोका उद्भवल्यास संदर्भात आवाज उठवला होता परंतु महसूल खात्याकडून पंचनाम्या पलिकडे काहीच कारवाई झाली नाही आजच्या परिस्थितीस कोणास जबाबदार धरणार असा सवाल नागरिक विचारत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *