पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) ब्रह्मांडाचा नायक व भोळ्या भक्तांचा पांडुरंग आपल्या डोळ्यात सामाऊन घेण्यासाठी भक्तगण पंढरीला पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पोहोचतात आणि चंद्रभागेचे स्नान करुन स्वतःस कृतकृत्य झाल्याचा आनंद अनुभवतात.आज आषाढ शुद्ध एकादशी अर्थात देवशयनी असे या एकादशीचे नांव आजपासून चातुर्मास प्रारंभ होतो.राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर शेजारच्या राज्यातून देखील अनेक भाविक पंढरपुरात दाखल होतात.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा सोहळा होऊ शकला नाही त्यामुळेच यावर्षी पंढरी भक्तांच्या मेळ्याने फुलून गेली होती.राज्यभरातून संतांच्या पालख्या येथे पोहोचल्या आणि चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तांचा खेळ रंगला.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत गजानन अशा अनेक संताच्या पालखी सोहळ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले.पालखी सोहळ्यात प्रवासात कसलीच अडचण जाणवली नाही अनेक ठिकाणी अश्व रिंगण सोहळ्याचाही आनंद अनुभवास आला.

आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापुजा केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *