पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून दोन हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम चालू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, येरवडा पुणे येथील राज्य वस्तू सेवा कर विभागात काम करणारी महिला लोकसेवक जोत्स्ना रामचंद्र कोरडे राज्य कर निरीक्षक यांनी तक्रारदार यांचे बॅकेतील बंद खाते चालू करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लिअरन्स सर्टीफिकेट साठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती यावर तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली त्यानंतर या विभागाकडून याची पडताळणी करण्यात आली व दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.त्याचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याचे काम यरवडा पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाने केली.
