पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढत आहे नुकतीच पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत अशा नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्यात येईल अशी घोषणा आज करण्यात आली आहे.यासाठी जी लस घेतलेली असेल तीच लस बूस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असून देशातील परिस्थिती अवघड होतं आहे विशेषतः महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ व दिल्ली येथील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे यावर वेळीच प्रतिबंध घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य शासनाने कठोर निर्णय घेण्यात येतील असे स्पष्ट केले आहे.
आज राज्यात २६ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले त्यात एकट्या मुंबईत १५ हजार रुग्ण सापडले राज्याच्या अनेक शहरातून नवीन रुग्णाची भर पडत आहे त्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
