(हवेलीनामा वृत्त समूह)

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज निधन झाल्याने हजारो अनाथांची माता त्यांना सोडून गेल्याचे दुःख होत आहे सिंधुताईंनी सुरुवातीपासूनच अनेक दुःख सहन केली या दुःखातून मार्गक्रमण करत त्यांनी आपल्यावर बेतलेल्या प्रसंगातून त्यांनी अन्य अनाथ मुलांना आश्रय देण्याचा मार्ग निवडला आणि त्यातून त्यांचे अनाथ आश्रम निर्माण झाले त्यांनी आपल्या हयातीत हजारो अनाथ मुले दत्तक घेऊन त्यांचे पालन-पोषण, शिक्षण पूर्ण केले.यातून अनेक अधिकारी तर अनेक समाजसेवी नागरिक घडले,जे वेगवेगळ्या देशविदेशात सेवा करत आहेत.

          हजारो अनाथांची आई अर्थातच माई आज त्यांना कायमस्वरूपी सोडून गेली आणि हे अनाथ पुन्हा अनाथ झाले आहेत.समाजात अनाथ मुलांसंदर्भात कायम आदर असतो परंतु त्यांना हवे असलेली आपले पणाची वागणूक मिळत नाही मायेची ऊब देणारी आईची सावली हवी असते ती देण्याचे काम माईंनी आपल्या संपूर्ण जीवनात केले त्या नेहमी सर्वांना लेकरा याच शब्दांनी संबोधित करत याचाच अर्थ त्या सर्वांची आई अशा स्वरूपात असायचे.
            मुलांना संस्कार देण्याचे कार्य आई वडील व गुरू करतात तर समाजाला संस्कार करण्याचे काम माई सारख्या समाजसेवी व्यक्ती करत असतात त्यांच्याकडून कायम उपेक्षित व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याची दिशा दिली जाते.स्वतःच्या मुलांना घडवत असताना समाजातील अन्य मुले देखील याचे हक्कदार आहेत याची जाणीव त्यांच्या कार्यातून दिसून येते.
           त्यांच्या चेहऱ्यावर कायम समाधानाचे स्मित हास्य असायचे,डोक्यावर पदर व अतिशय साध राहणीमान परंतु विचारातील प्रगल्भता मोठी होती त्या अनुभवाचे चालते बोलते  विद्यापीठ होत्या अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी काय करावे याचे धडे दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *