पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) ‘गेली दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात आपण लढलात त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात तत्वांना तिलांजली देऊन सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं’, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात केला. ते पुढे म्हणाले की, ‘सन २०१९ मध्ये महाराष्ट्रात निवडणुका झाल्या त्यावेळी मी स्वत: इथे आलो शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जातील अस ठरलं होतं. मुख्यमंत्री देखील भाजपचाच असेल हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना निवडणुकीनंतर बदलली त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं बोललो नाही.” ते म्हणतात मी खोटं बोलत आहे. ठिक आहे. मी खोटं बोलतोय असं मानू. पण तुमच्या सभेच्या पाठीमागे जे पोस्टर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज किती होती पहा. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचे नाव घ्यावं लागले. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितले होते फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आहेत आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला व सत्तेत बसले’, असा घणाघातही शाहांंनी केला.
देशात इंधर दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेत त्यावरील टॅक्स कमी केला. मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना राज्य सरकारांनीही आपला कर कमी करावा असे आवाहन केले, भाजपशासित राज्यांनीही मोदींच्या आवाहनला प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केला.परंतु महाराष्ट्रातील या सरकारला वेगळेच सुचले यांनी इंधन नाही तर दारू स्वस्त केली, अशी खोचक टीका शाहांनी केली.
