थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) आळंदी म्हातोबा(ता.हवेली) गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संदीप पवार तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिवरकर यांची निवड झाली. आळंदी म्हातोबाच्या सरपंच सोनाली जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली यात ग्रामसेवक पी एस पवार यांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदा बाबत असलेला शासन आदेश वाचून दाखविला यात समोपचाराने सर्वानुमते निर्णय घेण्यात येऊन माजी उपसरपंच अशोक जवळकर यांनी प्रास्ताविक करून अध्यक्षपदी संदीप पवार व उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिवरकर यांचे नाव घोषित केले त्यासाठी वाल्मिक जवळकर यांनी अनुमोदन दिले.मावळते तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रवादी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी गावकामगार तलाठी योगीराज कणीचे, उपसरपंच सुनीता शिंदे,माजी उपसरपंच श्रीहरी काळभोर,सदस्य पारस वाल्हेकर,दयानंद शिवरकर व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच भगवान जवळकर,दत्तात्रय जवळकर,शंकर जवळकर,विजय जवळकर, आबासो जवळकर,सोमनाथ जवळकर,मोहन जवळकर,लक्ष्मण भोंडवे,बाळासाहेब
शिवरकर,पांडुरंग खटाटे,तेजस शिवरकर,राजेश जवळकर,महेश जवळकर, माऊली जवळकर,बाप्पूसाहेब जवळकर,रतन झेंडे,रामभाऊ भोंडवे,तुषार जवळकर,कैलास शिवरकर,गणेश जवळकर,जालिंदर जवळकर,महेश गायकवाड,श्रीपाद जवळकर,गणेश पवार ,सागर पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते
