थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) वाळू व्यवसायावर गेल्या अनेक वर्षांपासून बंदी असली तरीही तो बंद झालेला नाही या व्यवसायातून अनेक बाहुबली तयार झाले त्यातून टोळीचे साम्राज्य निर्माण झाले यावर ना हरित लवादाने नियंत्रण आणले ना महसूल विभागाने मोठया कारवाया केल्या त्यामुळे हा व्यवसाय चालूच राहिला
पूर्व हवेलीत आजही अनेक ठिकाणी ओढ्यातून वाळू काढून ती धुवून विकण्याचा धंदा चालूच आहे वाळू उपस्याअवर पूर्णपणे बंदी असताना यावर कारवाई का होत नाही पुणे सोलापूर महामार्गावर बोरकरवस्ती वस्ती येथील ओढ्यातून वाळू उपसा जोरात सुरु असूनही महसूल विभाग याकडे डोळेझाक करत आहे त्यामुळे वाळूमाफिया ओढ्याची अक्षरशः खुल्लेआम लचक्के तोडत आहेत, ओढ्यातील वाळू उपस्याला नेमका आशिर्वाद कोणाचा हा माञ थेऊर फाट्यावर चर्चेचा विषय बनला असून नागरिकांमध्ये या वाळू उपसाची खंमग चर्चा सुरु आहे आधीच ओढ्यावर चौफेर आतिक्रमण ते कमी काय आता वाळू उपसामुळे हा ओढा पुन्हा चर्चेत आला आहे
वाळूचे बाजारभाव सध्या गगनाला भिडले आहेत वाळू उपसा तसेच वाहतुकीस बंदी तरी देखील पुणे सोलापूर महामार्गालगत हा बेकायदेशीर धंदा जोमात चालू आहे, महामार्गावर अनेक वाहने क्षमतेपेक्षा ज्यास्त वजनाची वाहतुक करणाऱ्या वाळूची वाहने बिनदिक्कतपणे रोज रस्त्यावर धावतात पंरतू वाहतुक विभाग तसेच महसूल विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहेत याला नेमका आळा बसणार तरी कधी असा प्रश्न पर्यावरण प्रेमीना पडला आहे ओढ्यातून उपसलेल्या लाखो रुपयांची वाळूचोरी करणाऱ्यावर महसूल कारवाई करणार का पुन्हा तुटपुंजी कारवाईचा दिखावा करणार हे पाहणे औस्तुक्याचे आहे.
