थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) शहरी भागासह ग्रामीण भागातील शाळाची बर्याच दिवसापासून बंद असलेली घंटा आता वाजणार असून “उठाउठा घंटा झाली शाळा भरण्याची वेळ झाली,” दोन वर्षाषासून बंद असलेल्या अंगवाडी ते चौथीचे वर्ग येत्या सोमवार पासून सुरु होणार असल्यामुळे बालचमूंमध्ये आंनदाचे वातावरण आहे शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु होणार असल्यामुळे सर्व जय्यत तयारी केली आहे खूप दिवसातून शाळेची घंटा वाजणार असून लहान मुलांचा बंद असलेला किलबिलाट पुन्हा सुरु होणार आहे
कोरोना महामारीच्या ओढवलेल्या संकटामुळे गेली तब्बल पावणे दोन वर्षापासून शाळा बंद होत्या परंतु शिक्षकांना दररोज उपस्थिती लावणे बंधनकारक होते या बंदच्या काळात ग्रामीण भागातील मराठी शाळांचे रुपडे पलटले असून शाळांच्या भिंती रंगरंगोटी करुन त्यावर शालेय अभ्यासक्रम अवतरले आहेत शाळेची स्वच्छता तसेच रखडलेली सर्व कामे या दोन वर्षाच्या कालावधीत जवळपास मार्गी लावली त्यामुळे शिक्षक तसेच मुलांना मध्ये आंनदाचे वातावरण आहे राज्यातील बंद असलेल्या मराठी माध्यमासह इंग्रजी माध्यामाच्या शाळा सुरु होणार असल्यामुळे बस चालकांमध्ये आंनदाचे वातावरण असून जवळपास दोन वर्षापासून बंद असलेली विद्यार्थी वाहतुक पुन्हा चालू होऊन चालकांना इतक्या दिवसापासून उभी असलेली वाहने आता विद्यार्थ्यांना घेऊन धावणार आहे ,शाळा बंद असल्यामुळे बस चालकांवर बँकेचे कर्जाचे थकलेले हप्प्ते कुंटुंबाचा उदार्निवाह कसा भागवायचा असा प्रश्न भेडासावून आर्थिक उलाढाल बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती आता ही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येणार असल्यामुळे अनेकांचे बंद झालेले रोजगार पुन्हा सुरु होणार असल्यामुळे बस व्यावसायिकांमध्ये खुशीचे वातावरण आहे
यावर हिंजवडी येथील प्राची पायगुडे या पालकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणित पालकांपेक्षा शिक्षकांची भूमिका मोठी असते शाळेपासून इतकेदिवस दूर असल्याने मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला आहे ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना मोबाईलचे वेड लावले आहे शाळा उघडणार असल्याने ही सवय घालवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे
