पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर टाकलेल्या २ कोटींपेक्षा अधिक रकमेचा सशस्त्र दरोडा स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही दिवसात उघडकीस आणून गुन्हेगाराकडून रू. २ कोटी १९ लाख किंमतीचे ७ किलो ३२ तोळे दागिने व १८ लाख रोख रक्कम हस्तगत केली आहे
        पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरखेड गावच्या हद्दीत बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपरखेड शाखेमध्ये पाच अनोळखी व्यक्तींनी येऊन कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व ग्राहकांना हातातील पिस्तुलचा धाक दाखवून रोखपालास हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवून बँकेतील रू. ३२,५२,५६०/- रोख रक्कम व रू. २,४७,२०,३९०/- किंमतीचे ८२४ तोळे १३०मि.ग्र.वजनाचे असे एकुण रू २,७९,७२,९५०/- सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकून चोरुन नेले दिनांक २१/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल करणेत आला आहे.
        हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनास्थळी मनोज लोहिया, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलींद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग , राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड उपविभाग यांनी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना सुचना देऊन स्थानिक गुन्हे शाखा, शिरुर व दौंड उपविभागाची एकूण ५ तपास पथके तयार करून तपास करण्यासाठी रवाना करण्यात आली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकास
गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,  हा गुन्हा डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, रा वाळद, ता. खेड, जि पुणे याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहीती मिळाली त्यानुसार शोध घेत असताना तो मध्यप्रदेशात येथे गुन्हा करून पळून गेल्याची माहीती प्राप्त मिळाल्याने एक पथक त्यांच्या शोधाकरीता मध्यप्रदेश येथे रवाना केले त्यानंतर हा दरोडेखोर अहमदनगर येथील निघोज, ता. पारनेर, जि. पुणे येथे येणार असल्याची बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने त्याला निघोज येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने नमुद गुन्हा हा त्याचे साथीदार २) अंकुर महादेव पाबळे,रा कावळपिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे, ३) धोंडीबा महादु जाधव, रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. अ.नगर, ४)आदिनाथ मच्छिंद्र पठारे, रा. पठारवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ५) विकास सुरेश गुंजाळ, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या मदतीने केला असल्याची माहीती दिली त्यावरून त्या सर्व दरोडेखोरांना ताब्यात घेऊन गुन्हयातील गेले मालाबाबत त्यांचेकडे तपास करून गेले मालापैकी रू. २,१९,१५,३७०/- किंमतीचे ७ किलो ३२ तोळे दागिने व १८,२७,५९०/-रोख रक्कम असा एकूण रू.२,३६, ४२,९६०/-किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
     या तपासादरम्यान गुन्हेगारांनी मागील ३ महीन्यांपासून बँकेवर दरोडा टाकण्याची पुर्वतयारी केलेली होती. त्यादरम्यान टोळीतील प्रमुख डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याने मध्यप्रदेश येथून तीन पिस्टल प्राप्त करून घेतले, या गुन्ह्यात  २ गाडयांचा वापर केलेला असून मेटेलीक ग्रे रंगाची सियाज कार नं. एम.एच. ०५ सी. एम. १२९३ या गाडीचा रंग बदलून पांढऱ्या रंगाची करून घेतली होती व गुन्हा केल्यानंतर तिचा रंग बदलून घेण्यासाठी मध्यप्रदेश येथे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाले आहे व पोलीसांना चकवा देण्याकरीता दरोडा टाकल्यानंतर ती गाडी बदलून चोरलेली रक्कम निळया रंगाची बोलेनो गाडी नं. एम. एच. १४ एस.एम.०७०७ या मोटारीतून मुद्देमाल लंपास केलेला होता. दरोडेखोरांनी स्वत:ची ओळख लपून रहावी याकरीता गुन्हा करण्यापुर्वी एकाच प्रकारची जॅकेट, शुज, ट्रॅक पॅन्ट, हॅण्डग्लोव्हज्, मास्क अशी कपडे खरेदी करून त्या कपडयांचा वापर करून गुन्हा केलेला आहे व गुन्हा केल्यानंतर कपडे जाळून टाकणे अशाप्रकारे विविध क्लुप्त्या वापरून गुन्हा केलेला असतानाही पुणे ग्रामीण पोलीसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेले आहे.
       या गुन्हयाची उकल स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, संदिप येळे, नेताजी गंधारे, सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहा. फौज. तुषार पंधारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन, दिपक साबळे, विक्रम तापकीर, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, अनिल काळे,रविराज कोकरे, पो.ना.योगेश नागरगोजे, गुरुू जाधव, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, सहा. फौज. विजय माळी, प्रकाश वाघमारे, काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, प्रसन्न घाडगे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, संदिप वारे, धिरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगे, प्राण येवले, बाळासाहेब खडके, म.पो.का.पुनम गुंड, समाधान नाईकनवरे, दगडु विरकर यांनी केलेला असून त्यांना शिरूर पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहा.पोलीस निरीक्षक, संदिप कांबळे, पो.स.ई जगदाळे,  पडळकर, जाधव,म.पो.स.ई.चरापले, सहा.फौज. पठाण, पो.हवा.भगत, अमित कडूस, साठे, पो.ना.नितीन सुद्रीक, बाळासाहेब भवर,शिंदे, जगताप, संजु जाधव, पो.कॉ.नागलोत, नेमाणे, साळवे, जंगम, गुणवरे, पिठले, साळुंके यांनी देखील तपासात मदत झालेली आहे.
        अटक करण्यात आलेल्यापैकी डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याचेवर १) घोडेगाव पोलीस स्टेशन खुनाचा गुन्हा, २) खेड पोलीस स्टेशन मध्ये मारामारीचा गुन्हा ३) खेड पोलीस स्टेशन शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असून, अंकुर महादेव पाबळे याचेविरुद्द शिरूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा तर धोंडीबा महादु जाधव याचेविरूध्द शिरूर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा, दरोडयाचा असे दोन गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहीती समोर आलेली आहे सदर गुन्हयाचा पूढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *