थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  कोरोना निर्बंध शिथिल झाल्या नंतर गाव पातळीवर रखडलेल्या ग्राम समित्या नियुक्ती साठी सध्या गावोगावी ग्रामसभांचे आयोजन केले जात असून    कुंजीरवाडी येथे अश्याच ग्रामसभेचे सरपंच अंजु गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करून ग्राम तंटामुक्ती समितीची निवड करण्यात आली.यात तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सचिन उद्धव कुंजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, चंद्रकांत मेमाने,सागर निगडे, हरेश गोठे,ग्रामसेवक प्रकाश गळवे, माजी सरपंच संतोष कुंजीर,पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, माजी उपसरपंच सुरेश कुुंंजीर,भरत निगडे, स्वप्नील कुंजीर,प्रकाश घुले, रामदास कुंजीर, शिवसेना विभाग प्रमुख सुभाष कुंजीर, काळूराम कुंजीर, राहुल कुंजीर,नवनाथ आंबेकर, भाऊसाहेब कुंजीर,एकनाथ कुंजीर,महेंद्र कुंजीर, दादा धुमाळ,विशाल वाईकर,पत्रकार विजय रणदिवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *