थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) संसारात पुरुष व स्त्री यांचे सामान महत्त्वाचं एका रथाचे ते दोन चाके आहेत त्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केवळ पुरुषांच्या आर्थिक कमाईवर घर प्रपंच चालविणे अलीकडच्या काळामध्ये कठीण होऊन बसले आहे त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळणे आवश्यक असल्याने  प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मांजरी परिसरातील जवळपास साडेसातशे महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षापासून चालू आहे.

या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या महिलांच्या घरगुती उद्योगासाठी तसेच त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांनी जमा केलेल्या बचतीच्या प्रमाणात प्रतिष्ठानकडून देखील तितकीच रक्कम जमा करून जे भांडवल जमा होईल त्यातून या महिलांना बिनव्याजी कर्ज सुविधा करून दिली आहे त्यामुळे या महिलांच्या जीवनमानात बदल घडले आहे अशाच प्रकारच्या योजना भविष्यामध्ये थेऊर – आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातील महिला भगिनींच्या साठी योजनेचा मानस असून महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे हे उद्दिष्ट ठेवले आहेत.

समाजात काही प्रमाणात एकल महिला असतात त्यांना मदतीची नितांत गरज असते त्यांच्या पाल्याची जबाबदारी विशेष करून शैक्षणिक जबाबदारी घेणे आवश्यक असते आर्थिक अडचण असल्याने अशा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठा परिणाम होत असतो म्हणून  प्रकाश शेठ प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यात या जिल्हा परिषद गटातील अशा एकल महिलांच्या मदतीसाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येईल असे उद्योजक प्रकाश सावंत यांनी यावेळी सांगितले.

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रकाश सावंत यांच्या पत्नी सौ पुष्पलता प्रकाश सावंत आपल्या प्रतिष्ठानच्या आणि पतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाच्या जोरावर या जिल्हा परिषद गटात निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महिलाशी असलेला दाट संपर्क आणि राजकीय पार्श्वभूमी या पाठबलावर मतदार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी त्यांना खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *