मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) विरोधकांना बहिणीच्या आयुष्यातील होत असलेला बदल पचनी पडत नाही त्यामुळे विरोधक बोलता की हे पैसे फक्त निवडणुक होईपर्यंत मिळणार आहेत.परंतू मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने सांगतो की, या योजनेमध्ये पहिल्यांदा १० हजार कोटी नंतर ३५ हजार कोटी रूपयांची अशी एक वर्षेभरासाठी एकूण ४५ हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. महराष्ट्रातील सर्व महिलांना खात्रीपूर्वक सांगतो ही योजना चालूच राहणार आहे. निवडणुका येतील जातील पण हे तुमचे पैसे तुमचा अधिकार आहे. भविष्यात या योजनेमध्ये आणखी वाढ देण्याचा विचार करत आहोत. भविष्याचा विचार करून आम्ही ही योजना मांडली आहे. या योजना चालू राहणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर महायुती सरकारने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महायुती सरकारने आपल्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकालातील केलेल्या कामांचा आढावा मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान केले आहे. विरोधकांनी ही योजना निवडणुक झाल्यावर बंद पडणार असल्याचा खोटा प्रचार चालवला आहे. यावर बोलताना अजित पवारांनी या लाडकी बहीण योजनेच्या रकमेत आणखी वाढ देणार असल्याचे सांगितले आहे.
