थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळा पंढरपुरहून परतीच्या मार्गावर असून परतीच्या मार्गावरील हवेली तालुक्यातील उरुळीकांचन येथील नियोजित मुक्काम काही कारणास्तव रद्द करून तो लोणी-काळभोर येथील कदमवाकवस्ती येथे घेण्यात आल्याची माहिती संत तुकाराम महाराज संस्थान देहू तसेच पालखी सोहळा प्रमुख यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू वरून पंढरपूर कडे जात असताना लोणी काळभोर मुक्काम आटोपून यवतकडे हा सोहळा जात असताना दुपारचा मुक्काम उरळी कांचन येथे असतो गावात पालखी सोहळा येणार नाही याची पूर्वकल्पना सोहळा प्रमुखांनी दिलेली होती त्यानंतरही उरुळी कांचन येथील नागरिकांनी हा सोहळा गावात आणावा अशी आग्रही भूमिका मांडून सोहळा अडविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी मोठा वाद झाल्यानंतर पालखी सोहळा उरुळी कांचन येथे न थांबता यवतकडे मार्गस्थ झाला यावर मोठा वाद झाल्याने परतीच्या मार्गावर उरळी कांचन येथे असणारा रात्रीचा मुक्काम रद्द झाल्याची माहिती पुढे येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *