पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील बंद असलेल्या यशवंतची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच कारखाना चालू करण्यासाठी सर्व गटतट नातीगोती भावकी गावकी बाजूला ठेवून  कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जेष्ठ नेते माधव आण्णा काळभोर यांच्यासह तालुक्यातील नेते,सर्व पक्षाचे नेते शेतकरी अटोकाट प्रयत्न करत होते.परंतू दोन व्यक्तींच्या अहंकारी वृत्तीमुळे यशवंतची निवडणूक सभासदांवर लादली गेली.सभासदांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता निवडणूक एकतर्फी होणार आहे शेतकरी सभासद हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देणार असल्याची ग्वाही बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी रायवाडी परिसरात प्रचार करत असताना सभासदांना दिली  यावेळी सभासद शेतकरी यांच्याशी बोलताना दिलीप काळभोर म्हणाले की निवडणूक झाली तर आपापसातले गट तट मतभेद यामुळे कारखाना सुरू करण्यात अडचणी येऊ शकतात हे ओळखूनच माजी जिल्हा परिषद सदस्य माधव आण्णा काळभोर महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर व आम्ही बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. कारखाना सुरू करायचा असेल तर गट तट भेदभाव विसरून सर्व समावेशक सर्वपक्षीय बिनविरोध संचालक मंडळ निवडून जाणे गरजेचे आहे याची जाणीव आम्हाला झाली म्हणून निवडणूक आम्ही स्वतःपासून सुरुवात केली. लोणी गावातील पारंपरिक विरोधक असताना सुद्धा माधव आण्णा काळभोर व आम्ही सर्व मंडळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात गेली 15 दिवस अनेक बैठका घेतल्या. प्रामुख्याने गुलमोहर कार्यालय येथील “निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे चर्चासत्र” ज्यामध्ये उमेदवारी अर्ज भरलेले सर्व इच्छुक उमेदवार तालुक्यातील सर्व नेते मंडळी व शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध झाली तर याचे श्रेय आम्हाला जाईल म्हणून तालुक्यातील दोन अति महत्वकांक्षी नेते मंडळींनी प्रत्येक मीटिंगमध्ये मुद्दामून गोंधळ घालून आमच्या प्रयत्नांमध्ये आडकाठी घातली. स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी यांनी संपूर्ण कारखान्यांच्या  सभासदांवर ही निवडणूक लादली.

या सर्व बिनविरोध प्रक्रियेमध्ये दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद, माऊली आबा कटके यांनी मध्यस्थी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्या समवेत माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, प्राचार्य के डी कांचन, माजी आमदार बापूसाहेब पठारे, देविदास भन्साळी, प्रकाश मस्के, सुरेश घुले, प्रताप गायकवाड, सोपान कांचन, विकास दांगट, महादेव कांचन, राजीव घुले, पांडुरंग काळे, संदीप भोंडवे, माणिकराव गोते, रोहिदास उंद्रे रामभाऊ कुंजीर, मारुती कुंजीर, तात्यासाहेब काळे, महेंद्र पठारे कुशाभाऊ गावडे, रघुनाथ चौधरी, बाबासाहेब काकडे, राजेंद्र टिळेकर, राजाराम कांचन, गुलाब चौधरी, तुकाराम पवार, सुदर्शन चौधरी सुभाष आप्पा काळभोर, विलास अण्णा काळभोर इत्यादी तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नेते मंडळींनी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. राहूल काळभोर यांनी सांगितले की कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून रोज सकाळी नऊ ते रात्री बारा अशा बारा ते पंधरा तास बैठका घेतल्या विरोधकांची मनधरणी केली व वेळप्रसंगी विनवणी केली. उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचे प्रयत्न सुरू होते तरी तालुक्यातील सर्व जनतेने आमचे प्रयत्न पाहिलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीत सभासद या नतदऋष्ट मंडळीना  धडा शिकवून आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलला बहुमताने विजयी करणार असा मला विश्वास असल्याचे काळभोर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *