थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) तीन आसनी रिक्षाचालकांचा मनमानी कारभार प्रवाशांच्या जीवावर बेतत असताना नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्याच्यावर आहे असे पोलीस प्रशासन तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून कसलीच कारवाई होत नाही.यामागे नेमके काय गौडबंगाल दडलय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. पूर्व हवेलीतील पुणे सोलापूर मार्गावरील मुजोर रिक्षाचालक सध्या बेताल वागत आहेत. रिक्षात तीन आसनाची परवाणगी असताना सर्रास आठ प्रवाशांची वाहतूक ती देखील वाहतूक पोलिसांच्या समोर होत आहे,यात अपघात घडल्यानंतर नेमक कोणास जबाबदार धरायचे प्रशासन की रिक्षाचालक हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

थेऊरफाटा थेऊर दरम्यान वाहतूक करणार्‍या रिक्षामधून हा सर्रास प्रकार घडत आहे थेऊरफाटा चौकात दररोज दोन वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वार्डन असतात त्यांच्यासमोर हे रिक्षा भरल्या जातात काल शनिवारी असाच एक रिक्षा आठ प्रवाशी घेऊन थेऊरकडे जात असताना गाढवेमळा वळणावर भरधाव वेगात समोरुन येणाऱ्या अवजड वाहनास घासला,यात रिक्षातील एका वयस्कर व्यक्तीस त्या वाहनाची डोक्यास धडक बसली यात तो गंभीर जखमी झाला तर एका महिलेस मार लागला दैव बलवत्तर म्हणून रिक्षा पलटी झाली नाही अन्यथा यात मोठा अनर्थ घडला असता.

या घटनेत ज्या प्रवाशांनी अनुभव घेतला त्यांनी सांगितले की, आम्ही नशिबवान होतो परंतु आमच्या हृदयात धडकीच भरली हा दररोजचा जीवघेणा प्रवास आम्हाला करावा लागतोय, भविष्यात दुर्घटना घडल्यास याचे परिणाम काय होतील.

यावर पोलीसांकडून कडक कारवाई होणार का असा सवाल नागरिक विचारतात की काही जणांचा बळी घेतल्यानंतर हे प्रशासन जागे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *