थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)   देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट विरळ झाल्याने सर्वत्र नागरिकांनी गर्दी केली आहे तब्बल दीड वर्ष नियंत्रण लाडल्याने अनेकांना कधी सुटका होते असे वाटत होते सध्या धर्मिकस्थळी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे महत्वाचे म्हणजे येथे कोरोनाचे नियमन देखील होत नाही त्यामुळे संक्रमण वाढण्याची भीती जास्त भासते.

        नुकताच दक्षिण आफ्रिकेत  कोरोनाचा ओमीक्रोन हा नवीन व्हेरियंट आढळून आला असून त्याने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे त्यावर संशोधन चालू असून त्याची घटकता किती आहे हे लवकरच कळेल तरीही महाराष्ट्र शासनाने निर्बंध कडक करण्याचे धारविले आहे
         गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी अनिवार्य करणे आवश्यक आहे तसेच मंदिर प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस आवश्यक केले पाहिजेत असे केले तरच येणाऱ्या धोक्यास आपण नियंत्रणात ठेऊ शकू अन्यथा संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता जास्त आहे.बहुतेकानी मुखपट्टी वापरणे बंदच केली आहे धार्मिक स्थळे असलेल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी यावर नियोजन करावे लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *